“जे.ए.टी. महिला महाविद्यालयात “भारतीय कृषिविषयक समस्या” या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील वेबिनार संपन्न”

 

“जे.ए.टी. महिला महाविद्यालयात “भारतीय कृषिविषयक समस्या”  या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील वेबिनार संपन्न”



भूगोल विभाग व अंतर्गत गुणवत्ता नियमन समिती (
IQAC)यांच्या संयुक्त विद्यमाने जे. ए.टी.कला ,विज्ञान आणि वाणिज्य महिला महाविद्यालय,मालेगाव याठिकाणी “भारतीय कृषिविषयक समस्या ” या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते .

            या प्रसंगी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भूगोल विभागाचे प्रा.पवार व्ही.के. यांनी केले. वेबिनारसाठी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित सर्व पाहुण्यांचा परिचय व स्वागत भूगोल विभागाचे प्रमुख डॉ.सावंत डी.डी. यांनी केला .वेबिनारच्याअध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अन्सारी मो.हारून मो.रमजान हे होते .त्याच बरोबर महाविद्यालयाच्या शैक्षणिक व प्रशासकीय समन्वयक डॉ.सलमा अब्दुल सत्तार ,अंतर्गत गुणवत्ता नियमन समिती (IQAC) समन्वयक प्रा.मुनव्वर अहमद ,नॅक(NAAC)समन्वयक प्रा.सुनेत्रा मेश्रामकर इ.मान्यवर उपस्थित होते. या वेबिनारचे एकूण दोन सत्रात आयोजित करण्यात आले होते.

            या वेबिनारप्रसंगी प्रथम सत्रात बोलतांना मॉडर्न कॉलेज, पुणे येथील प्रा.डॉ.पाटील संजय सर  यांनी “भारतीय कृषी समस्या व उपाय ” या विषयावर आपले विचार मांडले ,यात ते म्हणाले कि आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्वाचा भाग असलेला कृषी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे.वाढत्या लोकसंख्येनुसार आवश्यक असलेले उत्पादन मिळवण्यात शेतकऱ्यास दिवसेंदिवस अडचणी येत आहेत. त्याचा परिणाम म्हणून महागाई मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्याचबरोबर सरकारी धोरणे ,सरसकट कर्जमाफी यासारख्या गोष्टी कश्याप्रकारे प्रभाव टाकत आहेत यावरही त्यांनी प्रकाश टाकला .

             या वेबिनारप्रसंगी द्वितीय सत्रात बोलतांना म.स.गा.कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,मालेगाव कॅम्प ,मालेगाव येथील प्रा.डॉ.प्रवीण पाटील सर यांनी “ऑक्सिजन देणाऱ्या वनस्पतींचे महत्त्व ” या विषयावर आपले विचार मांडले ,यात त्यांनी भारतीय संस्कृतीमध्ये कश्याप्रकारे तुळस, कोरफड,इ . ऑक्सिजन देणाऱ्या वनस्पतीं सुरुवातीपासूनच आपल्या घराच्या आजूबाजूस उपलब्ध असत .त्याचा विविध प्रकारे आपणास उपयोग होत असे, बदलत्या काळानुसार वेगवेगळ्या कारणांनी या वनस्पती आपल्या परिसरातून कमी कमी होत चालल्या आहेत, त्यावर उपाय म्हणून या सर्व वनस्पतीची पुन्हा लागवड करण्यावर भर देणे किती महत्वाचे आहे याचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले .

                      वेबिनारचे आभार प्रदर्शन प्रा.दुकळे एस.आर. यांनी केले. जे.ए.टी.महिला महाविद्यालयाचे भूगोल विभागाचे प्रा.दळवी एम.डी.,प्रा.अन्सारी नाझमीन , इतर सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी , विविध ठिकाणचे मान्यवर,प्राध्यापक ,विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाइन पद्धतीने जोडलेले होते. वेबिनारचे यशस्वी आयोजन व अंमलबजावणीसाठी जे.ए.टी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष मा .अन्सारी नेहाल अहमद साहेब यांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

4 Comments